खिर्डी (ता. रावेर):
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील खिर्डी गावात मुख्य रस्ते आणि अंतर्गत भागांना पाण्याचा वेढा बसला असून जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.मुख्य रस्त्यावर पाणी; ट्रॅक्टरसह मालवाहू वाहन अडकले
सततच्या पावसामुळे खिर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने रस्त्यावरून जाणारा एक ट्रॅक्टर आणि एक छोटा हत्ती (मालवाहू गाडी) रस्त्याच्या मधोमध पाण्यात फसले. दोन्ही वाहने अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली. सुदैवाने, आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत चालकांना सुरक्षित बाहेर काढले.प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार
या बिकट परिस्थितीला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप खिर्डीतील संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. खिर्डी गावातील मुख्य रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली असून, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने रस्त्याची साधी डागडुजी किंवा नालेसफाई केली नाही. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावर साचले असून, कचऱ्याचे ढीग देखील पाण्यात तरंगत आहेत.
ग्रामस्थांचा इशारा
वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम आणि पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न केल्याने आधीच खिर्डी गावात तीव्र असंतोष आहे. आजच्या या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करायला हवे खिर्डी बु. व खिर्डी खुर्द अश्या दोन ग्रामपंचायती असू सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन हे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा खेळ करत आहे . लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी तीव्र स्वरूपाशी मागणी होत आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा