रावेर / मुंजलवाडी:
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) रावेर आगाराच्या ढिसाळ आणि बेजबाबदार नियोजनाचा मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथील शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींना शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी दररोज तब्बल अडीच तास एसटी बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे.दुपारी ठिक 04:00 वाजता शाळा जी कॉलेज सुटूनही बस थेट संध्याकाळी 06:30 वा.येत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंजलवाडी गावातील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दररोज शिक्षणासाठी रावेर शहरात येतात. दुपारी ४:०० वाजता शाळा सुटल्यानंतर हक्काची बस लगेच उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, रावेर आगाराच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे या विद्यार्थ्यांना दुपारी ४:०० वाजेपासून ते संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत बस स्थानकावरच वेळ वाया घालवावा लागत आहे.
रात्री उशिरा घरी आगमन; सुरक्षेचा प्रश्न गंभीर
संध्याकाळी ६:३० वाजता बस सुटत असल्यामुळे मुंजलवाडी गावी पोहोचेपर्यंत पूर्णपणे अंधार पडतो. रात्री उशिरा घरी जावे लागत असल्याने, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. "मुले वेळेत घरी न आल्यामुळे आम्हाला दररोज जीव मुठीत धरून राहावे लागते. अडीच तास बस स्थानकावर वाया गेल्यामुळे मुलांच्या अभ्यासाचेही मोठे नुकसान होत आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया मुंजलवाडीतील पालकांनी दिली आहे. तातडीने 'विद्यार्थी फेरी' सुरू करण्याची मागणी
रावेर आगार प्रमुखांनी मुंजलवाडीच्या विद्यार्थ्यांची ही होणारी प्रचंड गैरसोय रोखण्यासाठी शाळा सुटण्याच्या वेळेनुरूप म्हणजेच संध्याकाळी 05 वाजे दरम्यान विशेष बस फेरी सुरू करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चक्का जाम आंदोलनाचा इशारा
या गंभीर समस्येकडे रावेर आगार प्रशासनाने त्वरित लक्ष दिले नाही आणि मुंजलवाडीच्या बसेसची वेळ तातडीने सुधारली नाही, तर मुंजलवाडी गावातील सर्व विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ रावेर बस स्थानकावर तीव्र चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
या गंभीर समस्येकडे रावेर आगार प्रशासनाने त्वरित लक्ष दिले नाही आणि मुंजलवाडीच्या बसेसची वेळ तातडीने सुधारली नाही, तर मुंजलवाडी गावातील सर्व विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ रावेर बस स्थानकावर तीव्र चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा