रावेर येथे २२ जुलै रोजी 'उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा' नियोजनासाठी महत्त्वाची बैठक - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

२१ जुलै २०२६

रावेर येथे २२ जुलै रोजी 'उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा' नियोजनासाठी महत्त्वाची बैठक

 रावेर तालुका 

   प्रतिनिधी 


            संपूर्ण महाराष्ट्रभरात सध्या अनुसूचित जाती (अनु. जाती) उपवर्गीकरणाचा मुद्दा अत्यंत गंभीर बनला असून, यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी रावेर तालुक्यात एका भव्य 'उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचे' नियोजन केले जात आहे.



         या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आणि नियोजनासाठी रावेर येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक दिनांक २२ जुलै २०२६, वार - बुधवार रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता 'तक्षाशीला बुद्ध विहार, सावदा रोड, रावेर' येथे पार पडणार आहे.
                       हा मोर्चा सर्व समाज समावेशक असून, तरुण पिढीला अन्यायापासून मुक्त करण्यासाठी आणि हक्काचा लढा उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या गुलामी मुक्तीच्या लढ्यात सर्वांनी घराबाहेर पडून संघर्ष करण्याचे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.



               या महत्त्वपूर्ण बैठकीला रावेर तालुक्यातील सर्व फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, कर्मचारी, तसेच धार्मिक, राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, भिम सैनिक, तरुण मित्र मंडळी आणि समस्त सुजान नागरिकांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here