राष्ट्रनिर्मितीचे प्रेरक व्हा; युवा अधिकाऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे आवाहन - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

२१ जुलै २०२६

राष्ट्रनिर्मितीचे प्रेरक व्हा; युवा अधिकाऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे आवाहन

 

महाएल्गार न्युज 

   प्रतिनिधी

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाच्या चौथ्या प्रादेशिक चिंतन शिबिराचा लखनऊ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे यशस्वी समारोप झाला. 'विकसित भारतासाठी विकसित युवा' या विषयांतर्गत आयोजित या दोन दिवसीय शिबिरात पहिल्या दिवशीच्या विचारमंथनातून आलेल्या शिफारशींचे युवा-केंद्रित प्रशासनात रूपांतर करण्यावर भर देण्यात आला.


युवकांचा राष्ट्रनिर्माणात सहभाग वाढवणार
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री खडसे यांनी युवा अधिकाऱ्यांना युवकांना राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले. 'माय भारत', 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' आणि 'फिट इंडिया' यांसारख्या उपक्रमांमुळे धोरणांचे चांगले परिणाम साध्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. युवा व्यवहार विभागाचे सहसचिव शिव रतन यांनी विविध मंत्रालयांची 'माय भारत' सोबत भागीदारी करण्याची उत्सुकता वाढत असल्याचे नमूद केले. तसेच 'माय भारत'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रियांका शुक्ला यांनी अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक करत नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्यावर भर दिला.



माय भारत, अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम , पंतप्रधान इंटर्नशिप योजना आणि 'फिट इंडिया' यांसारख्या उपक्रमांमुळे प्रादेशिक स्तरावरील प्रभावी अंमलबजावणीमुळे धोरणांचे अधिक चांगले परिणाम साध्य होत असल्याचेही सांगत त्यांनी झालेल्या सादरीकरणाचे कौतुक केले.
विविध मंत्रालयांकडून माय भारत सोबत भागीदारी करण्याबाबत वाढत असलेली उत्सुकता, युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी हे व्यासपीठ एक महत्त्वाचे माध्यम म्हणून उदयास आले आहे, असे युवा व्यवहार विभागाचे सहसचिव शिव रतन म्हणाले. राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक भागधारक यांच्याशी अधिक सखोल सहकार्य प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. अशा भक्कम भागीदारीमुळे विभागाचा जनसंपर्क आणि प्रभाव आणखी बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक राज्यासमोर स्वतःची वेगळी आव्हाने आहेत आणि प्रत्येक आव्हानासाठी त्या राज्याला अनुरूप उपाययोजनांची आवश्यकता आहे. विकसित भारत या राष्ट्रीय ध्येयाशी सुसंगत राहून स्थानिक समस्यांवर स्थानिक उपाय विकसित करून तळागाळातील संघटना अधिक सक्षम करण्यावर आपला भर असला पाहिजे, असे ते म्हणाले.

                    माय भारतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रियांका शुक्ला यांनी चिंतन शिबिरादरम्यान संबोधित करतांना अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले आणि युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. स्वयंसेवा, नेतृत्व आणि सामूहिक सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून युवकांना सक्षम बनविण्यातच माय भारतच्या यशाचे रहस्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, विविध राज्यांतील सर्वोत्तम कार्यपद्धतींची प्रभावीपणे नोंद करून त्यांचा व्यापक स्तरावर विस्तार करण्यात यावा, यावरही त्यांनी भर दिला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात पंतप्रधान इंटर्नशिप योजना आणि फिट इंडिया या उपक्रमांवरील तांत्रिक सत्रांनी झाली. या सत्रांमध्ये विविध विभागांमधील समन्वय आणि सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला. समारोपाच्या दिवशी विभागाच्या प्राधान्याच्या विषयांवर कार्यरत गटांनी तयार केलेल्या विषयनिहाय कृती आराखड्यांचे आणि विविध प्रकरणांवरील अभ्यासांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण ठरले. या गटांनी नशामुक्त भारत, फिट इंडिया, लिंगसंवेदनशीलता, युवा नेतृत्व आणि स्वयंसेवा, अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम , समाजाचा सहभाग वाढविणे तसेच माय भारत आणि माय भारत-राष्ट्रीय सेवा योजना अधिक सक्षम करण्याबाबतच्या शिफारशी सादर केल्या.



दोन दिवसांच्या या चिंतन शिबिरातून, तळागळात अधिक व्यापक पोहोच, संस्थांमधील अधिक समन्वय आणि सहकार्यपूर्ण प्रशासनाच्या माध्यमातून युवकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रनिर्मितीसाठी माय भारत हे व्यासपीठ आणखी सक्षम करण्याचा विभागाचा सामूहिक निर्धार व्यक्त करण्यात आला. या विचारमंथनातून समाजाशी अधिक सखोल सहभाग, वर्तनपरिवर्तनासाठी जनजागृती, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक भागधारक यांच्याशी अधिक भक्कम भागीदारी, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि तळागळात कार्यरत अधिकाऱ्यांची क्षमता सातत्याने वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. याशिवाय, प्रमुख उपक्रमांची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यनिहाय अंमलबजावणी धोरणे, सर्वोत्तम कार्यपद्धतींची नियमित देवाणघेवाण आणि मंत्रालय तसेच विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण संवादाची आवश्यकता असण्यावर अधिकाऱ्यांनी भर दिला.



उत्तर प्रदेशचा विशेष गौरव

समारोप सत्रात माय भारत अंतर्गत सर्वाधिक नोंद उत्तर प्रदेशचा विशेष गौरवदणी झाल्याबद्दल उत्तर प्रदेशला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून गौरविण्यात आले. युवकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक नोंदणीची टक्केवारी गाठल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचाही गौरव करण्यात आला. तळागाळात प्रभावी जनसहभाग आणि व्यापक जनसंपर्क साधण्यात या केंद्रशासित प्रदेशाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे यावरून दिसून आले. चिंतन शिबिरातून पुढे आलेल्या शिफारशी भविष्यातील कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक ठरतील तसेच, विकसित भारत 2047 चा पाया म्हणून विकसित युवा घडविण्याबाबत युवा व्यवहार विभागाच्या कटिबद्धतेला अधिक बळकट करतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here