७५ वर्षीय महिलेचा रावेरमध्ये ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू. - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

०५ जुलै २०२६

७५ वर्षीय महिलेचा रावेरमध्ये ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू.

        बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात


रावेर प्रतिनिधी. । 

                       रावेर शहरातील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ७५ वर्षीय महिलेचा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत महिलेचे कुटुंब रोजगाराच्या शोधात रावेर येथे आले असल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (क्रमांक HP19G0655) हा पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी जात होता. त्याचवेळी चहा पिऊन परत येत असलेल्या पितांबरबाई शहा बाबुसा शहा (वय ७५) या ट्रकच्या मागील बाजूस आल्या. ट्रक सुरू असल्याचा अंदाज न आल्याने त्या मागील चाकाखाली सापडल्या. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मदतकार्य केले. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनीही रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.


या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीदरम्यान पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


विशेषतः पेट्रोल पंप परिसरात जड वाहनांची सतत वर्दळ असल्याने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे एका गरीब कुटुंबाचा आधार हरपला असून परिसरातून शोकभावना व्यक्त होत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनीही अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here