आ.अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिरास प्रारंभ - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

०५ जुलै २०२६

आ.अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिरास प्रारंभ

रावेर तालुक्यातील दिव्यांग बंधूंना मोठा दिलासा .!


 रावेर (प्रतिनिधी) : 

                      तालुक्यातील दिव्यांग बांधवांची तपासणी व त्यांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी यांना जळगाव, मुक्ताईनगर या ठिकाणी जावे लागत होते त्या ठिकाणी जाण्या येण्याची होणारी हेड सांड लक्षात घेता आमदार अमोलभाऊ जावळे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून रावेर येथेच तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर दर महिन्याला घेण्याची मागणी केली त्या अनुषंगाने रावेर येथे दर महिन्याच्या शुक्रवारी शिबिर ठेवण्यात येणार असून याचा शुभारंभ करण्यातआला. 

                             रावेर ग्रामीण रुग्णालय येथे या शिबिराचा शुभारंभ नगराध्यक्ष सौ संगीता महाजन यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी जि प सदस्य गोमती बारेला माझी शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन अरुण शिंदे नगरसेवक राजेंद्र चौधरी राजे शिंदे अरुण आस्वार भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील युवा तालुका अध्यक्ष उमाकांत महाजन सी एस पाटील नितीन पाटील भूषण महाजन योगेश महाजन आरिफ जमादार बाळा आमोदकर निलेश पाटील अजिंक्य वाणी निलेश सावळे उमेश महाजन शेख मेहमूद हे उपस्थित होते. 

                           प्रास्ताविकात ग्रारुचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैभव गिरी यांनी या शिबिरा विषयी सविस्तर माहिती दिली दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यासाठी नोडल अधिकारी डॉ प्रवीण पाटील नेत्ररोग तज्ञ नितीन विसपुते नाकान घसा तज्ञ डॉ विजय कुरकुरे अस्थिरोग तज्ञ डॉ स्वप्निल कळसकर बालरोग तज्ञ डॉ अनिरुद्ध साळुंखे मानसोपचार तज्ञ गजानन परखड फिजिशियन डॉ रुचिका आडे हे उपस्थित होते सुरेश धनके, अरुण शिंदे व पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून सदर शिबिर सुरू झाले असून यापूर्वी देखील डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलेले आहे लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासित देखील केले. 

                           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार डॉक्टर स्वप्नील कळसकर यांनी मानले शिबिर सुरू असताना आमदार अमोलभाऊ जावळे यांनी भेट दिली असून लाभार्थ्यांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व उपस्थित तज्ञ डॉक्टर मंडळी यांना काही मार्गदर्शक सूचना देखील केल्या यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर संदीप पाटील रवींद्र महाजन व सहकारी उपस्थित होते तर शिविर यशस्वीतेसाठी आधीपरिचारिका रिता धांडे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय बुवा खजिनदार रजनीकांत बारी उपाध्यक्ष घनश्याम हरणकर बाळू महाजन रमेश चौधरी यांच्यासह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here