संतोष ढिवरे
रावेर तालुका प्रतिनिधी
रावेर हादरले! जमिनीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून; अपघाताचा बनाव रचणारा आरोपी काही तासांत गजाआड
जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याने काकाचा लाकडी काठीने डोक्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील गारखेडा येथे घडली आहे. खुनाचा हा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह नाल्याशेजारी टाकून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. मात्र, रावेर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे आणि वैज्ञानिक पद्धतीने तपास करत अवघ्या काही तासांत या हत्याकांडाचा पर्दाफाश केला असून आरोपी पुतण्याला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, गारखेडा येथील रहिवासी रामा थावरू बारेला (वय ४६ वर्षे) यांचा मृतदेह २१ जुलै २०२६ रोजी रात्री संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. रावेर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर जखमा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी तत्परतेने गुन्हा रजि. क्र. ३५८/२०२६ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या चौकस तपासाने उघडकीस आला गुन्हा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेर पोलिसांनी तांत्रिक माहिती, भौतिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे वेगाने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान निष्पन्न झाले की, मृत रामा बारेला यांचा त्यांचा सखा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९ वर्षे) याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होता.२१ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास याच वादाच्या रागातून आरोपी अनिलने घराबाहेर रामा यांच्या डोक्यावर लाकडी काठीने जोरदार वार केला. हा वार इतका गंभीर होता की रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनाक्रम आणि पोलिसांचा तपास:
मिळालेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी रात्री गारखेडा येथील रामा थावरू बारेला (वय ४६ वर्षे) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. रावेर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, तेव्हा मृताच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.
ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. संदीप पाटील व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा