विशेष प्रतिनिधी, सासवड:
आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात सोमवार (१३ जुलै २०२६) रोजी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड-जेजुरी मार्गावर एका अनियंत्रित ट्रकने वारकऱ्यांच्या दिंडीला मागून जोरात धडक दिली. या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील ३ महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ४ महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत.बेलसर टोलनाक्याजवळ दुर्घटना
हा अपघात सकाळी ८:३० च्या सुमारास सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने ५०० मीटर अंतरावर, 'हॉटेल शिपदीप लॉजिंग'समोर घडला. अपघातातील वारकरी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील 'कसबे डिग्रज', 'कवलापूर' आणि 'माळगाव' परिसरातील रहिवासी होते. ट्रकची धडक इतकी तीव्र होती की ३ महिला वारकऱ्यांचा घटनास्थळीच जीव गेला.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे:
१. नंदा पवार (वय ५२ वर्ष, रा. कवलापूर)
२. माधवी राजाराम साळगरे (वय ५५ वर्ष, रा. माळगाव)
३. राजश्री शंकर भोसले (वय ५५ वर्ष, रा. कसबे डिग्रज)
१. नंदा पवार (वय ५२ वर्ष, रा. कवलापूर)
२. माधवी राजाराम साळगरे (वय ५५ वर्ष, रा. माळगाव)
३. राजश्री शंकर भोसले (वय ५५ वर्ष, रा. कसबे डिग्रज)
आजारी चालकाला औषधामुळे डुलकी लागली?
अपघातग्रस्त ट्रक (MH-26) हा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील 'रंगनाथ महाराज पोखरबिसीकर' दिंडीचा होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ट्रक चालकाला तीव्र ताप असल्यामुळे त्याने औषध घेतले होते त्यामुळे वाहन चालवताना औषधाच्या अमलाखाली त्याला डुलकी किंवा ग्लानी आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.जखमींवर उपचार आणि ५ लाख रुपयांची शासकीय मदत
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता स्थानिक नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने जेजुरी येथील आयसीयू (ICU) रुग्णालयात दाखल केले. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारतर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा