रावेर तालुक्यात वाघोड येथे अवैध दारू विक्री सुरूच; आश्वासनाची पूर्तता न झाल्याने १० जुलैपासून पुन्हा आमरण उपोषण - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

०७ जुलै २०२६

रावेर तालुक्यात वाघोड येथे अवैध दारू विक्री सुरूच; आश्वासनाची पूर्तता न झाल्याने १० जुलैपासून पुन्हा आमरण उपोषण

 रावेर:

रावेर तालुक्यातील वाघोड गाव आणि वाघोड फाटा येथील ढाब्यांवरील अवैध दारू विक्री बंद करण्याच्या प्रशासनाच्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या १० जुलै २०२६ रोजी रावेर तहसील कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अर्जदार अनिल पुंडलिक मशाने यांनी स्मरणपत्राद्वारे दिला आहे.


                यापूर्वी अर्जदार मशाने हे १५ जून २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी येऊन, "वाघोड गावात यापुढे अवैध दारू विक्री होणार नाही, झाल्यास त्यास आम्ही सर्वस्वी जबाबदार राहू," असे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर मशाने यांनी आपले उपोषण मागे घेतले होते.परंतु प्रशासनाने दिलेल्या या आश्वासनाला केराची टोपली दाखवण्यात आली असून, संबंधित दारू विक्रेते आज ही राजरोसपणे अवैध दारूची विक्री करत आहेत. प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
                 
              प्रशासनाच्या या उदासीनतेविरुद्ध अर्जदाराने आज, ७ जुलै २०२६ रोजी रावेर पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात स्मरणपत्र सादर केले आहे. जर १० जुलै २०२६ पर्यंत ही अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद झाली नाही, तर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या उपोषणामुळे होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही या पत्रात नमूद केले आहे.

       या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here