रावेर प्रतिनिधी :
भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा रावेरच्या कार्यकारिणीच्या पुनर्गठनासाठी येत्या शनिवारी, दिनांक १८ जुलै रोजी विशेष निवड सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सावदा रोडवरील तक्षशिला बुद्ध विहार येथे दुपारी ठीक १.०० वाजता पार पडणार असल्याची माहिती रावेर प्रतिनिधी विजय एस. अवसरमल यांनी दिली आहे.
जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची लाभणार प्रमुख उपस्थिती
रावेर तालुका शाखेची नवीन अधिकृत कार्यकारिणी गठीत करण्यासाठी आयोजित या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये प्रामुख्याने:
- डॉ. के. वाय. सुरवाडे (गुरुजी) – महाराष्ट्र राज्य सचिव
- सुमंगल तथा रवींद्र अहिरे (गुरुजी) – जिल्हाध्यक्ष
- सुशीलकुमार हिवाळे (गुरुजी) – जिल्हा सरचिटणीस
- प्रा. डॉ. संजीव साळवे – जिल्हा कोषाध्यक्ष
- रवींद्र वानखेडे व वसंत दादा लोखंडे – जिल्हा उपाध्यक्ष
- भिमराव पवार व संघरत्न दामोदरे – जिल्हा सचिव
या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रावेर तालुक्याची आगामी काळासाठीची नवी मजबूत कार्यकारिणी घोषित केली जाईल.
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक सभेला रावेर तालुक्यातील सर्व माजी श्रामणेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, बौद्ध उपासक, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेची शोभा वाढवावी, असे जाहीर आवाहन जिल्हा संघटक तथा रावेर तालुका प्रभारी विजय शामराव अवसरमल, तालुका अध्यक्ष विजय भोसले आणि तालुका सरचिटणीस राज सुरदास यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा