रावेर तालुक्यात खळबळ: निंभोरा बुद्रुक येथील गायींच्या चोरीचा छडा, ४ आरोपींना बेड्या; पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी - महा एल्गार

Breaking

एकूण पृष्ठदृश्ये

२१ ऑगस्ट २०२६

रावेर तालुक्यात खळबळ: निंभोरा बुद्रुक येथील गायींच्या चोरीचा छडा, ४ आरोपींना बेड्या; पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी

 रावेर:

रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथून दोन शेतकऱ्यांच्या ४ गायी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यात निंभोरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला पूर्ण यश आले असून, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कारवाई केली.


वाडीतून ४ गायी लंपास
निंभोरा बुद्रुक येथील रहिवासी लक्ष्मण गोविंदा बोढे (वय ६५) आणि त्यांचे शेजारी सुपडू विश्वनाथ नेमाडे यांच्या वाड्यातून २९ जुलै २०२६ च्या रात्री चोरट्यांनी एकूण ६६ हजार रुपये किमतीच्या ४ गायी चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. [ 172/2026 ] आणि BNS कलम [ 303 (2) ] अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

वरिष्ठांचे मार्गदर्शन
या गुन्ह्याचा तातडीने तपास करण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित आणि फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर यांनी तपास पथकाला मार्गदर्शन व आवश्यक सूचना दिल्या होत्या.

तपास पथकाची धडक कारवाई अन् आरोपींची नावे
वरिष्ठांच्या सूचनेवरून तपास पथकाने गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे सखोल तपास केला. या तपासातून चोरीचा गुन्हा उघडकीस आणत खालील ४ आरोपींना निष्पन्न करून अटक करण्यात आली आहे:
१. हयात शेख मासून मन्यार (वय २५, रा. मन्यारवाडा, चिनावल, ता. रावेर)
२. शेख आवेश शेख एजाज खान (वय २०, रा. ख्वाजानगर, सावदा, ता. रावेर)
३. शेख राजीद शेख शरीफ (वय २३, रा. ईदगाहजवळ, रसलपूर, ता. रावेर)
४. शेख नासीर शेख चांद (वय ४५, रा. वरणगाव, ता. भुसावळ)
        यांनी केली कारवाई:
सदरची यशस्वी कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोहेकॉ अविनाश पाटील आणि पोकॉ किरण कोळी यांच्या पथकाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here